About Me

कांदा पिकासाठी कोणते तननाशक वापरायचे त्याबद्दल माहिती जाणून घ्या.

500

तननाशक कसे वापरायचे. 

          नाशिक जिल्ह्यात कांदा हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असते. तसेच महाराष्ट्राच्या बर्‍याचश्या भागांमध्ये सुद्धा कांद्याचे पीक घेतले जाते.

कांद्याचे पीक घेतल्यावर सर्वाधिक होणारा खर्च हा गवताच्या निंदनी वर होत असतो. आणि तो रोखण्यासाठी आपण कांद्यावर तणनाशक फवारले पाहिजे. दादा कडा आष्टी याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची गरज ओळखून नामांकित कृषी कंपनी इंसेक्ट साईड इंडिया लिमिटेड ने ऑक्सिम तननाशक बाजारात आणले आहे. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

तणनाशकाचे प्रकार

1. ऑक्सिम तननाशक कधी वापरायचे.

कांदा पिकाची लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी ओक सिम तणनाशक वापरले तरी चालते. किंवा लागवडीनंतर दोन ते तीन पाणी दिल्यानंतर  त्याचा अंदाज घेऊन तणनाशकाची फवारणी केली पाहिजे. कांदा पिकातील खुरपणी करण्याला फार मोठा खर्च येत असतो. आणि फार वेळा ही जात असतो.

2. गोल आणि टरगा सुपर

     गोल आणि टरगा सुपर हे तणनाशक कांदा पिकाची लागवड केल्यानंतर पिकास पाणी दिल्यानंतर पिकासोबत उगवणारे गवत नष्ट करण्यासाठी तणनाशकाचा वापर केला जातो. तसेच रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर उभ्या पिकातील गोल आणि लांब पानांच्या तणाच्या व्यवस्थापनासाठी गोल तणनाशक 1 मिली आणि टर्गा सुपर 2 मिली प्रति लिटर प्रमाणे घेऊन फवारणी केली पाहिजे पिकात फवारणी करताना जमिनीत ओलावा असणे फार गरजेचे आहे.
                                 aapleshetkari. com