|GHEVDA | घेवड्याचे पीक कसे घ्यायचे. |GHEVDYACHE PIK|
उन्हाळी हंगामात कमी खर्चात आणि कमी वेळेत येणारे पीक म्हणजे घेवडा हे आहे. आणि घेवड्याचे कमी दिवसांत जास्त उत्पन्न मिळते. घेवडा हे पीक शेंगवर्गीय भाजीपाल्या मध्ये येते. घेवड्याची लागवड जास्तीत जास्त महाराष्ट्र, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये श्रावणी घेवड्याची लागवड जास्त प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रामध्ये घेवडा या पिकाची लागवड अंदाजे ३०००० हेक्टर एवढी दरवर्षी केली जाते.
घेवडयाच्या पिकासाठी जमीन आणि हवामान.
घेवड्याच्या पिकासाठी जमीन ही हलकी किवा मध्यम प्रकारची जमीन लागते. कारण अशी जमीन पाण्याचा निचरा लवकर करते. आणि पिकाला वाढ घेण्यास लवकर मदत होते. जर जमीन भारी असली तर झाडांची वाढ लवकर होते पान झाडांना शेंगा कमी बसतात आणि उत्पादनात घट होते आणि उत्पन्न कमी निघते. कोणती पान लागवड करण्याच्या अगोदर जमिनीचा सामू हा तपासून घेतला पाहिजे तो सामू हा ५.५ ते ६ च्या दरम्यान असाल पाहिजे.
घेवडा हे पीक थंडीत आणि पावसाळ्यात येणारे पीक आहे. घेवड्याच्या झाडांसाठी ओगयतेचे हवामान म्हणजे १५ ते ४० डिग्री से.सी तापमानात हे पीक खूप चांगल्या प्रकारे येत असते.
घेवड्याच्या काही जाती
घेवड्याच्या काही जाती श्रावणी,फरबसी गू , फणशी, टिगळावरे, फ्रेंच बीन ह्या काही घेवड्याच्या जाती आहेत. त्यापैकी काही जाती ह्या स्वता उभ्या राहतात तर काही दुसऱ्या च्या आधारावर वरती जातात. त्यामध्ये काही लवकर येणाऱ्या तर काही उशिरा येणाऱ्या जाती आहे. ते आपल्याला कोणत्या प्रकारची पाहिजे ती आपण निवडली पाहिजे.
घेवड्याच्या पिकासाठी पूर्व मशागत आणि लागवड हंगाम
जमिनीची उभी आडवी नांगरणी करून. घ्यावी त्यावर आळवट फिरऊन ढेकळ बारीक करून घ्यावीत. आणि रोटावेटर असेल ते फिरऊन घेऊन ढेकळ बारीक करून घ्यावीत. आणि आपल्या अंदाजानुसार २० ते २५ ट्रॅक्टर शेनखत जमिनीत टाकले पाहिजे.
महाराष्ट्रात घेवडा या पिकाची लागवड ही तिन्ही पान हंगामात करतात. खरिप हंगामासाठी जून, जुलै,महिन्यात करतात. आणि रब्बी हंगामासाठी सप्टेबर आणि ऑक्टोबर महिन्यात लागवड करतात, आणि उन्हाळी हंगामात लागवड करायची असेल तर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात लागवड करतात. खरीप हंगामात घेवडा पिकांची पेरणी केल्यास किवा तिफणीने पहिला पाऊस पडून गेल्यावर, जमीन वाफेवर आल्यास लागवड करायला पाहिजे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ सेमी आणि दोन झाडातील अंतर ३० सेमी ठेवले पाहिजे. यानंतर चाळवण देऊन दोन झाडत ३० सेमी अंतर ठेवले पाहिजे. टोकन पद्धतीने लागवड केल्यास बिया २ ते ३ सेमी खोलवर पुरल्या पाहिजेत. म्हणजे त्या लवकर उगवतात. उन्हाळी हंगामात बियांची पेरणी ६० ते ७० सेमी अंतरावर सरी वरंब्यावर करायला पाहिजे. वरंब्याच्या बाजूला बगलेत ३० सेमी अंतरावर २ ते ३ बिया लावाव्यात.