झेंडूचे पीक घेतल्यावर तुम्हाला मिळेत ईतका नफा.
झेंडू च्या फुलांचा वापर हा सण उत्सव समारंभ आणि पूजेच्या वेळेस झेंडूच्या फुलांची मागणी असते. झेंडू फूल जगभरात घेतले जाते. आफ्रिका आणि आशिया खंडात मोठ्या प्रमाणात त्याची लागवड केली जाते. भारतात झेंडूच्या फुलांना बरीच मागणी आहे. कारण ते हे फूल लग्नसमारंभात सजवतात. झेंडूच्या फुलांचे मूळ स्थान मेक्सिको हा देश मानला जातो. जगभरात ५० पेक्षा अधिक जाती आहेत.
झेंडू चे प्रकार
लाल
पिवळा
शेंद्रि
झेंडूच्या जाती
आफ्रिकन
या झेंडूच्या जातीची ऊंची वाढ उंच असते. यामध्ये पिवळा ,फिकट पिवळा ,नारंगी. या प्रकारचे रंग असतात.
फ्रेंच झेंडू
या झाडाची ऊंची कमी असते. याची रोपे बागेतील कुंडीत पान लावता येतात.
झेंडूच्या सुधारित जाती आणि संकरीत जाती.
लागवड कशी करायची
झेंडू ची लागवड करताना १८+३०, ४०+९० , ३० + ३० सेमी अशा अंतराने लागवड केली जाते. गादिवाफ्यावर लागवड करताना जमिनीची नांगरणी कोळपणी करायला पाहिजे. ३०ते ६० सेंटीमीटर रुंद आणि ३० सेंटीमीटर उंच गादिवाफे तयार करून घेतले जातात. दोन वाफयमद्धे ४५ सेंटीमीटर अशा अंतराने लागवड केली जाते.
झेंडूच्या लागवडीसाठी जमीन आणि मशागत
झेंडूच्या लागवडीसाठी माध्यम ते साधी जमीन निवडावी, जमीन ही पानी निचरा होणारी असावी. आणि लागवढीच्या अगोदर जमीन आडवी उभी २ -३ वेळ नांगरून घेतली पाहिजे. ढेकळी निघाली असतील तर ती फोडून घ्यावी. लागवड करताना हंगामानुसार सरी वरंब्यावर आणि गादी वाफे पाडून अशा दोन्ही पद्धतीने केली जात असते.
गादी वाफे तयार करून घेतले तर उत्पादन जास्त मिळत असते. पण कुठल्या पद्धतीने लागवड करायची हे बाजारभावाचा अंदाज पाहूनच ठरवल जात. तर नांगरणी आणि फडणीस झाल्यावर हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळवावे.
झेंडूसाठी खत
झेंडूच्या आफ्रिकन ,फ्रेंच आणि संकरीत जाती खताला उत्तम प्रतिसाद देतात. जमिनीची मशागत करताना हेक्टरी ३० टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळवले पाहिजे. माती परीक्षण करताना १०० किलो नत्र , ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाश हे खाते द्यायला पाहिजे. संपूर्ण स्फुरद, पालाष व अर्धी नत्राची मात्रा रोपांची पुनरलागवड करताना किवा पुनरलागवडी नंतर एक आठवड्यानी द्यायला पाहिजे. उर्वरित अर्धी नत्राची मात्रा ही रोपांच्या पुनरलागवडीनंतर ३० ते ४० दिवासणी द्यायला पाहिजे. नत्राची मात्रा जास्त झाल्यास पिकाची शाखिय वाढ भरपूर होते. फुलांचे उत्पन्न कमी मिळत असते त्यामुळे नत्र जास्त वापरायला नको पाहिजे.
पानी व्यवस्थापन
शेंडा खुडणे
आफ्रिकन झेंडू हा उंच वाढणार झेंडू आहे. त्याची वाढ नियंत्रित ठेऊन जास्तीत जास्त फुटवे तयार व्हावे आणि त्या उदेशाने शेंडा खुडला जातो. झेंडूचे झाड सरळ वाढत असते आणि जर त्याचा शेंडा तोंडाला तर त्याची वाढ खुंटते. आणि झाडाला खूप बगले फुटतात त्यामुळे झाडाचे झुडुप तयार होते आणि ऊंची पान नाही वाढत. झाडचा शेंडा हा योग्य वेळेतच तोंडाला पाहिजे फार लवकर पण नाही आणि उशिरा पण नाही जर शेंडा खुडायला फार उशीर झाला तर आपल्याला जे अपेक्षित पीक असत ते मिळत नाही.
झेंडू वरील रोग आणि उपाय योजना
मर रोग
करपा रोग
पाने पिवळी पडणे
नाग आळी
मावा,तुडतुडे,पांढरी माशी
मावा व तुडतुडे आणि पांढरी माशी या साठी १० लिटर पाण्यात डायथोएट ३०%प्रवाही मोनोक्रोटो फॉस ३६% प्रवाही २० मिलि फवारावे.
फुलांची काढणी.
उत्पादन (प्रतीएक हेक्टर )
आफ्रिकन झेंडू १५ ते १८ टन
फ्रेंच झेंडू १० ते १२ टन