टोमॅटो पिकावरील रोग व्यवस्थापन. |Tomato che pik.|
टोमॅटो हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे . टोमॅटो हे पीक नाशिक, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यात घेतले जाणारे पीक आहे . टोमॅटो पीक रब्बी ,उन्हाळी आणि खरीप या तिन्ही हंगामात घेतली जातात . टोमॅटो मध्ये अ ,ब आणि क जीवनसत्व असतात . लोह ,फॉस्फरस आणि पोषक अन्नद्रव्य टोमॅटो मध्ये पुरेशा प्रमाणात असतात . टोमॅटोच्या पिकलेल्या फळांपासून सुप ,सॉस ,केचप ,जाम ,जूस ,चटणी एवढे पदार्थ बनवतात. यामुळे टोमॅटोचे आऊदयोगीक महत्त्व वाढलेले आहे. लाल हे खाण्यास स्वादिष्ट तसेच पौष्टिक असते . याच्या आंबट स्वाद चे कारण आहे की यात साईटरिक अॅसिड आणि मेलीक अॅसिड असते.
टोमॅटो पिकासाठी लागणारे हवामान
तापमानातील चढ उतारांचा फळधारनेवर अनिष्ट परिणाम होतो. १३-२८ से या तापमानास झाडांची वाढ चांगली होते . फुले आणि फळे चांगली लागतात . रात्रीचे तापमान १८-२० से टोमॅटो ची फळधारणा चांगली होते . फळांना आकर्षक रंग आणणारे आयकॉपीन हेक्टरी रंगद्रव्य २६-३२ सेंटीग्रेडला तापमान असताना भरपूर प्रमाणात तयार होते . तापमान ,सूर्यप्रकाश आणि आदरता यांचा एकत्रित परिणाम पिकाच्या वाढीवर होतो. २०-३२ अंश से तापमान ११-१२ तास स्वच्छ सूर्यप्रकाश आणि ६०-७५ फळे टक्के आदरत असेल.
जमीन आणि पूर्वमशगत
टोमॅटो च्या पिकासाठी जमीन माध्यम ते भारी जमीन लागवडीसाठी योग्य असते . हलक्या जमिनीत फळे लवकर तयार होतात . पाण्याचा निचार चांगला होतो . आणि पिकांची वाढ चांगली होते. परंतु अशा जमिनीत शेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा करावा लागतो. आणि वारंवार पाणी देण्याची सोय असली पाहिजे.
टोमॅटो लावण्यासाठी जमीन उभी आडवी नांगरणी करून ,वखरणी द्यावी . जमिनीत हेक्टरी ३०-४० गाड्या शेणखत मिसळवावे लागवडीसाठी २ ओळीतील अंतर २-३ फुट व २ रोपांमधील अंतर १ १/२ -२ फुट ठेवावे . खरीप व हिवाळी हंगामासाठी ९० बाय ४५ से. मी अंतरावर लागवड करावी.
टोमॅटो पिकाच्या लागवडीच्या जाती
फुल राजा -
फुल राजाही टोमॅटो पिकाची उत्तम जात असून यामध्ये फळे नारंगी लाल रंगाचे असतात फुल राजा ही संकरीत जात आहे फुलराजा या जातीवर लिपकल व्हायरस या विशानुजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. फुलराजा या जातीचे उत्पादन क्षमता आहे ६०-५५ टन प्रती हेक्टर एवढी आहे.
राजश्री
राजश्री फुल राजाप्रमाणे टोमॅटो ची दुसरी जात आहे ही जात संकरीत जात असून क्लिपकड व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने या जातीवर पडतो. मात्र या जातीचे उत्पादन हे फुलराजा या वाणाच्या तुलनेत ८० ते ९० टन प्रती हेक्टर मिळते.
धनश्री
धनश्री या जातीचे फळ मध्यम गोल आकाराची नारंगी असतात. या जातिचे सरासरी उत्पादन हे सुद्धा ८० ते ९० टन प्रती हेक्टर एवढे होते लिपकल या व्हायरस या रोगांचा प्रादुर्भाव यावर प्रामुख्याने दिसून येत असतो.
टोमॅटो पिकांची रोपे तयार करण्याची आधुनिक पद्धत
महाराष्ट्रात साधारण तीनही हंगामात टोमॅटो पिकांची लागवड केली जाते शेतकऱ्याला अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी योग्य निवड व योग्य प्रकारे लागवड करावी लागते टोमॅटो या पिकाच्या संकरीतवानांसाठी १२५ ग्राम बियाणे एक हेक्टर क्षत्रांसाठी पुरेसे ठरते,तसेच शेतकऱ्यांनीरोपवटिका बनवताना ती जमीनचांगली निवडावी तिला दोन वेळा उभ्या व अडवया प्रकारात नागरणि करावे तसेच १ बाय ३ मीटर आकाराचे गडीवाफे तयार करावेत
फळ पोखरणारी अळी
टोमॅटो पिकातील ही कीड अतिशयउपद्रव वी असते या किडिमूळे टोमॅटो पिकाचे ३०टक्क्यापर्यन्तनहोते ही कीड टोमॅटो पिकाशिवाय हरभरा पिकात असल्यास तिला घाटे अळी म्हणतात . ही अळी कापूस पिकात बोंडाचे नुकसान करते . या आळीचा उद्रेक पाने ,फुले ,फळे ,ई पिकांच्या भागावर होतो हे कीड उषण उपोषण आणि सम हवामानात ही आढळते .
करपा:
करपा हे दोन प्रकारचे असतात. लवकर येणारा व उशिरा येणारा , असे दोन प्रकार आहेत. पानांवर पिवळसर डाग पडून नंतर गोल काळे तपकिरी ठिपके दिसतात. नंतर पाने वाळतात.
नियंत्रण moncozomb २५ ग्रॅम प्रती १० लिटर किवा tebuconazole १० मी. ली प्रती १० लिटरप्रमाणे फवारणी करावी.
विषाणूजन्य रोग
टोमॅटोमध्ये प्रामुख्याने ग्राऊंडनट बड necrosis व्हायरस व पर्णगूचछ हे विशानुजन्य रोग आढळतात. त्याचा प्रसार फुलकिडे ,पांढरी माशी यामुळे होतो. या किडीचे नियंत्रण केल्यास रोगांचे प्रमाण कमी ठेवतात. किडीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस किवा डायमेथोएट १५ - २० मी . ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करतात. रोग शेतामध्ये आढळल्यास झाडे उपटून टाकावी.
नियंत्रण
टोमॅटो पिकात नुकसान पातळीपर्यंत प्रादुर्भाव दिसताच malathion ३५ टक्के प्रवाही ४० मी. ली
पुनरलागवडी मुख्य पिकांच्या कडेने मका व चवळी लागवड करावी. तसेच झेंडूची लागवड केली तरी फायद्याचे असते.
लागवडी नंतर ४० -४५ दिवसांनी शेतात trichogramma चिलोणीस हे मित्र कीटक १ लाख प्रती हेक्टर या प्रमाणात ७ दिवसांच्या अंतराने २-३ वेळा सोडावेत . हे कीटक फळे पोखानाऱ्या किडीची अंडी शोधून त्यात स्वता;ची अंडी घालतात परिणामी फळे पोखरणारी कीड अंडी अवस्थेतच नष्ट होतात.
फळे पोखरणारी अळीची नियत्रणसाठी त्यांना रोगकारक ठरणारी विषणूचा वापर करता येतो . हेलिकोवहणार नुकलियर polihaydroxsideव्हायरस (एचएएनपीव्ही) १० मीली प्रती १० लीटर पाण्यातून सायंकाळी वेळेत फवारणी करावी .
५ टकेक निबोळि अर्क किवा कडूनीब आधारित azadirection ३००० पिपीएम २० मीली प्रती १० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
बी.टी जिवाणूजन्य किटकनाशक २० ग्रॅम १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.