About Me

या पद्धतीने उसाची लागवड करा होईल लाखो रूपये नफा.

उसाचे पीक कसे घ्यायचे याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचा.



    ऊस ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. उसाचे उपयोग जास्तीत जास्त गुळासाठी साखरेसाठी केला जातो.
   भारत व ब्राझील या देशात उसाची लागवड प्रामुख्याने केली जाते. भारतात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश हे राज्य ऊस टिकवण्यात अग्रेसर . 
     ऊस हे वार्षिक पीक . उसाच्या पेरा पासून खोडा च्या तुकड्या पासून नवीन रोप तयार होते. उसाला काळी कसदार जमीन लागते. कारण उसाला खूप पोषक करावे लागतात. लागण व खोडवा या ऊस पिकवण्याच्या दोन पद्धती आहेत उसापासून मोठ्या प्रमाणात साखर मिळते.

उसाच्या बियाण्याची निवड

उसाचे बियाणे हे पूर्ण वाढ झालेले आणि योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेल्या उसातूनच उसाचे बियाणे आणावे.
उसाचे बियाणे हे रोग आणि कीड नसलेले असावे.
बियाणे हे जाड रसरशीत आणि उसाच्या काठीचे डोळे पूर्ण फुगलेले आणि रोग मुक्त असायला पाहिजे.
सेक्सी मराठी बियाणाची लागवड शक्यतो लागवड करावी. खोडवा बियाणांमुळे उत्पादनात खूप मोठी घट दिसून येते.

उसासाठी हवामान आणि जमिनीची निवड

       ऊस हे उष्ण आणि समशीतोष्ण वातावरणात चांगले उगवले जाते ऊस उगवण्यासाठी तापमान 20 ते 25 डिग्री सेल्सियस योग्य असते, तसेच जमिनीची निवड करताना सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेली मध्यम किंवा भारी किंवा चांगली पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली जमिनीची निवड करायला पाहिजे.

   लागवडीपूर्वी ची तयारी म्हणजे जमिनीची पूर्वमशागत   

जमीन चांगली खोलवर दोन वेळेस उभी आणि आडवी नांगरून उन्हामध्ये चांगली तपून द्यायला पाहिजे.
ऊसाची लागवड करणे आधी पंधरा दिवस जमीन रोटाविटर किंवा याच्या साह्याने चांगली कुठून घेतली पाहिजे कळवणे आधी जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळले पाहिजे.
      दोन दिवसानंतर जमिनीच्या प्रकारानुसार चार ते पाच फूट अंतरावर सरी पाडावी आणि त्यामध्ये उसाची लागवड केली पाहिजे.
    उसाची जात किंवा वाण कोणती निवडायची.
महाराष्ट्र राज्यासाठी ऊस पीक च्या काही जाती खालील प्रमाणे आहेत.
   CO- 419, CO-7219, CO-7124, CO-86032, CO-265

ऊस लागवड हंगाम

  सुरू हंगामी

          या उसाची लागवड 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी च्या दरम्यान केली जाते हा ऊस 12 महिने शेतात राहतो.

   पूर्वहंगामी

          या उसाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर च्या दरम्यान केली जाते हाऊस शेतात 15 महिने राहतो.

     आडसाली

            या उसाची लागवड जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान केली जाते व हाऊस शेतात जास्तीत जास्त राहणारा उस म्हणून मानला जातो या उसाची मर्यादा 18 महिने शेतात राहण्याची आहे.

ऊस लागवडीची पद्धत

   लागवड पट्टा पद्धतीत 2.5 किंवा 3.6 फूट अंतरावर केल्यास उसाची वाढ जोमदार होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.
   ऊसाची लागवड करणे अगोदर रोग व कीड प्रतिबंधक उपाय म्हणून 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि 300 मिली मॅलेथिऑन प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करतात. त्यामध्ये टिपरी 10 ते 15 मिनिटे बुडवून नंतरच लागण करतात.
    उसाची लागवड करताना आडसाली ऊसाला एकरी 400 किलो नत्र 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश देतात. पूर्व हंगामामध्ये ेक्‍टरी 340 किलो नत्र 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश देतात. खत मात्रा माती परीक्षणानुसार याच देणे योग्य असते, या शिफारशीत खत मात्रे मधून लागवडीच्या वेळी 10 टक्के नत्र 50 टक्के स्फुरद आणि 50 टक्के पालाश या प्रमाणात देतात. उरलेली खाते स्फुरद आणि पालाश मोठ्या बांधणी वेळ देतात नत्राची चाळीस टक्के मात्रा ऊस लागवड झाल्यानंतर 45 व्या दिवशी 10 टक्के मात्रा 90 व्या दिवशी आणि 40% मोठ्या बांधणी वेळ देतात. तसेच सल्फर या खतांची मात्रा ागणी वेळी 60 किलो प्रति हेक्‍टर शेणखतात मिसळून दिली गेली पाहिजे त्यामुळे उसाचे पीक चांगले येते.

उसाची लागवड पद्धती कोण कोणते आहेत.

   ऊस लागवडीसाठी जमिनीच्या प्रकारांमध्ये मध्यम जमिनीत पाच फूट व भारी जमिनीत चार फूट सरी पाडून घ्यावे. वरंब्यावर एकामागून एक बियाणे पसरवावे बियाणाची लागवड आपण दोन पद्धतीने करू शकतो.

ओली पद्धत

  या पद्धतीमध्ये साडी मध्ये पाणी सोडून हाताने एकापाठोपाठ एक बियाणे सरीमध्ये दाबावे.

    कोरडी पद्धत

        या पद्धतीमध्ये आदी बियाणी सरीमध्ये पसरवावे व मातीने झाकून नंतर पाणी सोडावे.

उसाच्या पिकासाठी पाणी व्यवस्थापन

     ऊस हे पीक अधिक पाणी घेणारे असले तरी अतिरिक्त पाणी उसाचे उत्पादन घट होते.
 आज-काल ठिबक सिंचनाद्वारे जमिनीचा व्यास नष्ट होतो. भरपूर उत्पन्न मिळवता येते परंतु आपण दंडाच्या वापर करणार असू तर पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड सोडता पाणी देण्याची आवश्यकता नसते.
 परंतु उन्हाळ्यात सात ते दहा दिवस व हिवाळ्यात 15 ते 20 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात व काढणीपूर्वी एक महिना पाणी बंद करावे.

   ऊस परिपक्व झाल्याची लक्षणे

  पूर्ण ऊस पिवळसर होतो.
  वाढ खुंटते.
  डोळे फुगायला लागतात.
  ऊस मोडण्याचा प्रयत्न केला तर ऊस पेरावर मोडला जातो.
  उसाच्या रसाची गोडी वाढते.
  उसावर नखाने टिचकी मारली असता तू सारखा आवाज येतो.

      उसाची काढणी

      उसाचे काढणेही पक्व झाल्यावरच करावी अति लवकर किंवा अति उशिरा केलेले काढणे ऊस उत्पादनात मोठी घट दाखवते. ऊस तोडताना मजुरांना सूचना द्याव्यात की ऊस जमिनीलगतचा तुटला गेला पाहिजे अन्यथा खोडवा उसावर त्याचा विपरीत परिणाम होतो.