बटाटा लागवड | potatoes cultivation | batata lagvad
बटाटा पिकाची लागवड नाशिक पुणे सातारा बीड नागपूर या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त केली जाते. बटाट्यामद्धे प्रथिने फॉस्फरस या सारखी खनिजे असतात बटाट्यामद्धे ब आणि क जीवनसत्व असतात. बटाट्याचा उपयोग खाद्य पदार्थासाठी केला जातो.
बटाटा पिकासाठी हवामान
बटाटा हे पीक थंड हवामानात खूप चांगले येत असते. त्यासाठी १८ ते २४ अंश से. मध्ये तापमान साले पाहिजे. या तापमानात बटाट्याची वाढ ही खूप चांगली होत असते.
जमिनीची पूर्व मशागत
मशागत करायच्या वेळेस ३० ते ३५ टन चांगल्या प्रकारे कुजलेले शेणखत टाकले पाहिजे. कारण शेणखत टाकल्याने जमीन भुसभुशीत होत असते आणि अशा प्रकारच्या जमिनीमध्ये बटाट्याचे पीक खूप चांगले येते आणि भरघोस उत्पन्न मिळते. बटाट्याच्या पिकाला ९० ते ११० किलो नत्र आणि ९० ते ११० किलो पालश व \८५ किलो स्फुरद एक हेक्टर ळा टाकले पाहिजे. स्फुरद नत्र आणि पालाश लागवडी वेळी एकदाच वापरावे आणि अर्धे नत्र ते लागवडी नंतर २५ ते ३० दिवसांनी सरीत टाकून त्यावर मातीची भर टाकली पाहिजे जेणेकरून बटाटे तयार होण्यासाठी मोकळी जागा राहिली पाहिजे.
बटाट्याची वाण
कुफरी चंद्रमुखी - ही जात ९० ते १०० दिवसांत तयार होते या जातीचे बाटाटे लांबट गोल आणि पांढरे असतात. साठवणूक करण्यासाठी ही जात उत्तम आहे बटाट्याच्या या जातीस हेक्टरी २५० क्विंटल उत्पन्न मिळते.
कुफरी लवकर - ही बटाट्याची जात सर्वात लवकर येणारी जात आहे. या जातीच्या बटाट्याला तयार होण्यासाठी ७० ते ८० दिवस लागतात. या जातीचे बटाटे पांढरे आणि आकर्षक असतात. या जातीचा बटाटा साठवणुकीसाठी खूप चांगला असतो . आणि तो दीर्घ काळ टिकतो. याचे हेक्टरी उत्पन्न २०० ते २५० क्विंटल पर्यंत मिळते.
लागवड
खत व्यवस्थापन
पूर्वमशागतीच्या वेळी हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे पिकाला 100 ते 200 किलो नत्र 80 किलो स्फुरद व 100 किलो पालाश प्रति हेक्टरी देणे आवश्यक आहे त्या पैकी अर्धे नत्र स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे व राहिलेले नत्र लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी सरीत टाकून नंतर त्यावर मातीचा भर द्यावी
बटाटा पिकासाठी पाणी व्यवस्थापन
बटाटा पिकाचे अधिक व अपेक्षित उत्पादन येण्यासाठी पाणी व्यवस्थापनाचा मोठा वाटा आहे बटाटा पिकास पाण्याची एकूण गरज जमिनीच्या मगदुराप्रमाणे 50 ते 60 सेंमी एवढी आहे सरी किंवा वरंबा पद्धतीने रानबांधणी केल्यास पाण्याची बचत होऊन बटाट्याचे उत्पन्न जास्त मिळते लागवडीनंतर चे हलके आंबवणीचे पाणी द्यावे नंतर पाच ते सहा दिवसांनी पाण्याची दुसरी पाळी द्यावी
बटाटा पिकासाठी कीड व रोग नियंत्रण
दोन ते तीन दिवसातून पिकाची पाहणी करावी बटाटा पिकावर रस शोषण करणाऱ्या आळन वर कीटकनाशकाची फवारणी करावी बटाटा पिकासाठी कीड व रोग नियंत्रनासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे प्रत्येक चार ते पाच होळीनंतर लावावीत लवकर येणारा करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास पाण्यात मिसळणारी मॅन्कोझेब या बुरशीनाशकाची 25 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी उशिरा येणाऱ्या रोगासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून पहिली फवारणी करावी आळीचा जास्त प्रादुर्भाव आढळल्यास मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी घेऊन दुसरी फवारणी करावी