About Me

वांगी या झाडावर होणारे दुष्परिणाम आणि उपाययोजना

  




 वांगी या झाडावर होणारे दुष्परिणाम आणि                                                       उपाययोजना                                                                                                                         वांगे हे पीक संगळीकडक खूप जास्त प्रमाणात घेतले  जात असते . वांगी हे एक  असे पीक आहे ,ते एकदा लावले तर  एक ते दीड वर्ष  राहते . जास्त दिवस राहिल्यामुळे त्यामध्ये  मर रोग ,खोड आळी ,शेंडा आळी ,आणि खोडाला  बुरशी लागते . म्हणून वांगे मरायला लागतात.

  खत व्यवस्थापन 

 खते हे माती परीक्षण करून द्यायला पाहिजे . वांगी पिकासाठी मध्यम काळ्या जमीनिसाठी एकरी 60 किलो नत्र ,20 किलो स्फुरद  आणि 20 किलो पालाश आवश्यक आहे . सगळे स्फुरद व पालश आणि नत्र लागवडी वेळी द्यावे . आणि उरलेले नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यात विभागणी करून द्यावे . पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्याने , दुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि  शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन महिन्यांनी द्यायला पाहिजे. 

वांगी पिकाचे कीड व्यवस्थापन 

    ज्या जमिनीत टोमॅटो ,मिरची ,भेंडी किवा वेलवर्गीय भाज्या ही पिके घेतली असल्यास वांग्याची लागवड करू नये  सूत्रकृमीचा प्रादुर्भाव होतो. 

   रोपसाठी तयार केलेल्या वाफ्यात काऱ्बोफूऱ्ऑन 30  ग्राम टाकावे . तसेच रोपावर डायमेथोएट 30 टके प्रवाही 10 मिलि पाण्यात फवारावे . 

   लागवडीनंतर 45 दिवसांनी तुडतुडे ,मावा व पांढरी माशी या किडी आढळल्यास डायमेथोएट 

30 टके प्रवाही 10 मी.ली किवा मिथील डीमेटॉन 25 टके प्रवाही मी. ली किवा ट्रायझोफॉस  10 मी.ली 10 लिटर पाण्यातून फवारावे. 

    लागवडीनंतर 20 दिवसांनी दर आठवड्याला किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत . आणि खोल खड्यात  पुरून टाकावीत. 

     लागवडी नंतर 30 दिवसांनी बुरशी नाशक (ब्ल्यु कॉपर)  19 -19 liquid आणि 12-62 हे liquid मिसळून द्यावे . 

     वांगी पिकावर कोळी आढळल्यास पाण्यात गंधक 30 ग्रॅम किवा डायकोफॉल  20 मी ली  प्रती 10 लिटर पाण्यात फवारावे