मशरूम (अळिंब )|Mushroom Cultivation|मशरूम लागवड|
मशरूम बद्दल माहिती
मशरूम ही एक बुरशी सारखी वनस्पती आहे. मशरूम ला मराठी मध्ये आळीब असे म्हणतात. मशरूम च्या जगात १०००० ते १२००० जाती आहे. त्यापैकी काही जाती विषारी टर काही खान्यायोग्य आहेत. सध्या जगात मशरूम चे उत्पादन ८.५०० दशलक्ष मॅट्रिक टन ईतके आहे. मशरूम ची लागवड जास्तीत जास्त आशिया,चीन,कोरिया या देशात प्रामुख्याने घेतली जाते. जर्मनी या देशांमध्ये मशरूम हे जास्त खाल्ले जाते. हजारो वर्षांपासून मशरूम चा केला जात आहे.
मशरूमचे प्रकार
शिंपला मशरूम :
शिंपला मशरूम हे संपूर्ण भारतात घेतले जाते. शिंपला मशरूम हे बटन मशरूम पेक्षा कमी खर्चात येणारे पीक आहे. कमी जागेत आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी जात म्हणजे शिंपला मशरूम ही आहे. शिंपला मशरूमच्या उत्पन्नासाठी कमी पाणी लागते. ही खूप मोठी गोष्ट आहे. २०० लिटर पाण्यामध्ये शिंपला मशरूम चे उत्पादन घेतले जाऊ शकते.
बटन मशरूम:
बटन मशरूम ची लागवड ही जास्तीत जास्त आसाम , हिमाचल प्रदेश , पंजाब या ठिकाणी केली जाते . बटन मशरूम ची लागवड ही कंपोस्ट खतामध्ये केली जाते. कंपोस्ट खत तयार करायला १५ ते २८ दिवस लागतात. ते पिशव्यांमध्ये भरून त्याचे निर्जंतुकीकरण केले पाहिजे. आणि कंपोस्ट खतांच्या वजनाच्या ५ ते १० टक्के प्रमाणात मशरूम चे बियाणे पेरले जाते. आणि १० ते १५ दिवसांनी त्याच्यावर बुरशी आल्यावर दीड इंच जाडीच कंपोस्ट खत , माती , आणि वाळू यांच्या निर्जंतुकीकरणाचा थर टाकला पाहिजे. मशरूम च्या उत्पादनासाठी १२ ते १५ अंश से.सी तापमान पाहिजे. या तापमानात मशरूमचे पीक चांगले येते.
मशरूम चे पीक घेण्याकरता महत्वाच्या गोष्टी:
१ . मशरूम उत्पादन घेण्याच्या जागच परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे.
२ . मशरूमचे उत्पादन बंदिस्त जागेतच घेतले पाहिजे.
३ . मशरूमची लागवड करण्याच्या खोलीत हवा खेळती राहिली पाहिजे.
४ . मशरूमच्या खोलीतील तापमान हे ३० से. सी असले पाहिजे.
५ . मशरूम लागवड करणाऱ्या व्यक्तीने स्वच्छता घेतली पाहिजे. कपडे चप्पल स्वच्छ पाहिजेत.
६ . मशरूम साठी नवीन आणि कच्चा माल वापरायला पाहिजे.
७ . सूर्य प्रकाश मशरूम लागवड करण्याच्या खोलीत यायला नको पाहिजे.
८ . मशरूम बेड वर शिपायचे पानी हे स्वच्छ असले पाहिजे.
९ . मशरूमची पिशवी ठेवताना दोन पिशवीतील अंतर १० इंच ईतके ठेवले पाहिजे.
१० . मशरूम वर किड किवा रोग पडल्यास १ मिलि नुवाण १ लिटर पाण्यात फवारावे.
११ . मशरूम काढणी योग्य वेळेतच केली पाहिजे. मशरूम उन्हात वाळऊन पॅक पाकिटात ठेवले पाहिजे.
मशरूम लागवड पद्धत
जागा
पाणी
कच्चा माल
मशरूम साठी कच्चा माल म्हणजे शेतातील टाकाऊ घटक.
१ गव्हाचा भुसा २ भाताचा पेंड (तनस ) ३ सोयाबीन चा भुसा ४ कडबा ५ कपाशीच्या काड्या ६ गवत एवढे मशरूम उत्पादनासाठी कच्चा माल लागत असतो.
मशरूम प्रामुख्याने कच्या मालावर अवलंबून असते. कच्चा माल हा कोरडा असला पाहिजे. आणि तो नवीन काढलेले असाल पाहिजे. तो पावसात भिजलेला नको पाहिजे.
मशरूम लागवडीचे विविध टप्पे आहेत. पहिल्यांदा पाण्यात काड भिजवुन मग त्याचे निरजंतुकीकरण केले पाहिजे. त्यानंतर पिशव्यांमध्ये मशरूमचे बी भरून उगवले जाते. १४ ते २० दिवसांनी पिशवी काढली पाहिजे. व नंतर बी पेरणी केली पाहिजे. पिशवी फाडल्यानंतर ४ ते ५ दिवसांतच मशरूमची पूर्ण वाढ झालेली असते. मशरूम २ दिवसात उन्हात कडक वाळते. वाळलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून साठवणूक केली जाऊ शकते.
मशरूमचे औषधी गुणधर्म
मशरूम मध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा असते. त्यामुळे मधुमेह रोग्यांसाठी हे चांगले उपयुक्त आहे.
मशरूम हे किडनीच्या रोगावर उपयोगी औषध आहे, असे मानले जाते.
पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत होत असते.
मशरूमपासून लोणची , पापड , सूप पावडर ,हेल्थ पावडर , क्यापसुल , ईत्यादी उत्पादने बनविली जातात. या अशा उत्पादनाना बाजारात चांगला बाजार भाव मिळतो.