जनावरांच्या गोठ्यासाठी राज्य सरकारने दिले अनुदान, असा करा अर्ज"
आता राज्य सरकारने गाई म्हशी च्या गोठ्यासाठी अनुदान चालू केले आहे. हे अनुदान ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यात त्याची माहिती पोहचतच नाही. पण सरकारने गाई-म्हशी च्या गोठ्यासाठी 77 हजार रुपये दिले जात आहेत. शरद पवार यांच्या ग्राम समृद्धी योजनेच्या अंतर्गत ही योजना जवळपास 3 फेब्रुवारी पासून चालू झाली आहे.
![]() |
सरकार कडून शेतीची अवजारे ,ठिबक सिंचन ,तुषार सिंचन ,पीक पेरणी अवजार ,पीक काढणीच्या अशा हून अनेक योजनेचा अनुदान सरकार कडून देण्यात येतात. पण आता शेतकऱ्यांच्या जनावारांसाठी राज्य सरकारने देखील अनुदान दिले जातआहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनाची माहिती होत नाही पण गाई-म्हशी च्या गोठ्यासाठी सरकारने तब्बल 77 हजार रुपये राज्य सरकार कडून अनुदान देण्यात येत आहे. शरद पवार यांच्या ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत 3 फेब्रुवारी पासून या योजनेला सुरवात झाली आहे. ही योजना दिल्यामागचे कारण आपण जाणून घेऊया..
कारण शेतकऱ्याकडे जनावारांसाठी योग्य तसा निवारा नसतो,आणि जनावराना चांगला निवारा नसल्याने शेतकऱ्यांचे पशुपालनाकडे दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे याच धोरणांकडे बघून सरकारने गाई-म्हशींचा गोठा बांधण्याची शेतकऱ्यांची आयपत नसते आणि त्यामुळे सरकारने ही योजना सुरू केली आहे. शेतकऱ्याचा एकमेव जोडधंदा हा दूध व्यवसाय हा आहे आणि शेतकरी याच्याकडे दुर्लक्ष करत चालला आहे. त्यामुळे शेळी पालन , कुक्कुटपालन ,गाय-म्हैस पालन या मध्ये वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे ह्या हेतुकडे बघून सरकारने या योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येणार आहे. सर्व जुन्या आणि नवीन योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत सहभागी करण्यात आलेल्या आहेत.
शेतकऱ्यांना अनुदान म्हणून 77000 हजार रुपये मिळणार
गाई-म्हशी अशा 2-6 जनावारांसाठि गोठा बांधायचा असेल तर या जनावरांच्या गोठ्यासाठी 77 हजार 188 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. तर 6 किवा 12 त्यापेक्षा अधिक म्हणजे 12 जनावरांसाठी दुपट्ट तर 18 पेक्षा अधिक जनावरे असतील तर तिप्पट अनुदान हे दिले जाणार आहे.
अशा प्रकारे या योजनेचा लाभ घ्या
*ज्या शेतकऱ्याला लाभ घ्यायचा असेल तर ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा.
*अर्ज करताना सरपंच ,ग्रामसेवक किवा ग्रामविकास अधिकारी यापैकी कुणाकडे अर्ज केला त्याच्या नावापुढे बरोबर अशी खून करावी.
*ग्रामपंचायत चे नाव ,तालुका ,जिल्हा आणि अर्जाच्या उजवीकडे तारीख टाकून तुमचा फोटो चिटकवायचा आहे.
*खाली अर्जदाराचे नाव ,पत्ता ,जिल्हा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.
*आता तुम्ही जो अर्ज करत आहात त्यावर बरोबर अशी खून करा.
अर्ज भरताना कोणती काळजी घ्यायची.
*अर्जामध्ये तुमच्या कुटुंबाचा प्रकार म्हणजे अनुसूचित जाती ,जमाती ,भटक्या जमाती ,भटक्या विमुक्त जमाती ,महिलाप्राधान्य कुटुंब ,2008 च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्प भूधारक किवा सीमात शेतकरी या पैकी ज्या प्रकारात आपले कुटुंब आहे त्याचा उलेख करावा लागणार आहे.
*वरील निवडलेला कागदाचा पुरावा जोडावा.
*लाभार्थ्याच्या नावावर शेतजमीन आहे का ,असल्यास त्याचा सातबारा ,8 "अ " आणि ग्रामपंचायत नमूना जोडायचा आहे
*रहिवाशी दाखला जोडायचा आहे . शिवाय तुम्ही ज्यासाठी अर्ज केला आहे ते काम तुम्ही रहिवाशी ग्रामपंच्यायत मध्ये येते का ते लिहावे.
*ज्या कुटुंबाने अर्ज केला आहे त्या कुटुंबातील वय 18 पेक्षा जात असलेल्या सदस्यांची संख्या नमूद करायची.
*यानंतर तुमच्या कागद पत्रांची तपासणी केली जाईल. नंतर पंच्यातसमितीच्या अधिकाऱ्यांची सही शिकयानुसार पोचपावती दिली जाईल यात तुम्ही लाभ घेण्यासाठी पात्र आहे की नाही ते सांगितले जाते.
*तुमी मनरेगा लाभार्थी असाल तरी तुम्हाला लाभ घेत येणार आहे. पन जॉब कार्ड नसेल तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही. त्यामुळे तुम्ही जॉबकार्डसाठी ग्रामपंचायत मध्ये अर्ज करू शकता.