|गव्हाचे पीक कसे घ्यायचे|Cultivation of wheat crop|gavhache pik kase ghyayche|
जमीन
गहू पिकासाठी चांगल्या निचऱ्याची भारी आणि खोल जमिनीची निवड करायला पाहिजे. हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर खते घालने आवश्यक आहे. जिरायत गहू ओलावा टिकून धरणाऱ्या भारी जमिनीतच द्यायला पाहिजे. जिरायत गहू पेरणी ची वेळ जिरायत गव्हाची पेरणी ही ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात करायला हवी बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करायला हवी. त्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवली पाहिजे.
गहू पिकासाठी जमिनीची पूर्वमशागत
गहू पिकासाठी चांगला निचरा होणारी जमीन योग्य असते, परंतु हलक्या आणि मध्यम जमिनीत भरपूर खते व संतुलित रासायनिक खतांचा वापर केल्यास भरघोस उत्पन्न घेता येते. गव्हाच्या योग्य उत्पादनासाठी जमीन भुसभुशीत असणे आवश्यक आहे. कारण अशा जमिनीमध्ये गव्हाच्या मुलांची वाढ होते खरिपाचे पीक निघाल्यानंतर लोखंडी नांगराने जमीन खोलवर नांगरून घ्यावी नांगरट झाल्यानंतर हेक्टरी 25 ते 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत टाकावे. जमिनीची दोन दाखवू कुळवणी करावी.
गहू पेरणी पद्धत
गव्हाच्या जिरायती आणि बघायची वेळेवर पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर वीस सेंटीमीटर आणि बागायती उशिरा पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर कीमन 18 सेंटिमीटर इतके ठेवले पाहिजे. शक्यतो पेरणी दक्षिण-उत्तर तसेच पाच ते सहा सेंटीमीटर खोल केली पाहिजे.
पेरणीची योग्य वेळ
गहू पिकाची पेरणीची योग्य वेळ साधारणपणे भरघोस उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.,
सर्वसाधारणपणे गहू पिकास सुरुवातीचे वाढीस 10 ते 20 अंश सेल्सियस तापमान उपयुक्त ठरते किंवा चांगले असते, त्या दृष्टीने पेरणीच्या वेळा खूप महत्त्वाच्या आहेत. कोरडवाहू गहू पेरणी ही ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात केली गेली पाहिजे. बियाणाच्या चांगल्या उगवणीसाठी पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे फार गरजेचे आहे.
बागायती गव्हाची पेरणी शक्यतो नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. जेणेकरून गहू पिकास थंडीचे जास्तीत जास्त दिवस मिळतील सर्वसाधारणपणे या वेळी 10 ते 20 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असते, व या तापमानात गहू पिकाची चांगली उगवण होते.
बागायती गहू पेरणी 15 डिसेंबर पर्यंत आटोपती घ्यावी डिसेंबर महिन्याच्या 15 तारखेनंतर देखील पेरणी केल्यास काही हरकत नाही, परंतु उशिरा किंवा अति उशीर पण केली असता, उत्पन्नात खूप मोठी घट आढळून येते कारण उशिरा पेरणी केल्यास गहू पिकास थंड हवामानाचा कालावधी फारच कमी मिळतो परिणाम फुटव्यांची व ओंबीतील दाण्यांची संख्या कमी मिळते आणि उत्पन्नात जास्त घट होते.
गव्हाच्या पिकासाठी खते
हेक्टरी 25 ते 30 गाड्या शेणखत जमिनीत टाकले पाहिजे.
बागायती गव्हास वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी 120 किलो नत्र 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यायला पाहिजे. निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी वेळेस पेरून द्यावे उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर द्यायला पाहिजे.
उशिरा पेरणीसाठी हेक्टरी 80 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश ही खते दोन हप्त्यांमध्ये अंतर ठेवून दिली पाहिजेत.
गव्हासाठी पाणी व्यवस्थापन
जिरायती गहू पिकाची वाढ ही जमिनीतील असलेल्या ओलाव्यावरच होत असते. बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकासाठी जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी जास्त होऊ शकतात गहू पिकास देण्यासाठी एकच पाणी उपलब्ध असेल, तर ते पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी दिले पाहिजे.
गव्हाच्या सुधारित वाणी किंवा जाति
जिरायती पेरणी साठी =पंचवटी एन आय डी डब्ल्यू पंधरा किंवा शरद एक ए डी डब्ल्यू 2997
जिरायती आणि मर्यादित सिंचन साठी गव्हाची जात= नेत्रावती नाय ये डब्ल्यू 1415
बागायत वेळेवर पेरणीसाठी गव्हाची जात= तपोवन एन आय ए डब्ल्यू 917 व गोदावरी आयडी डब्ल्यू 295 , त्रंबक डब्ल्यू 301
बागायती उशिरा पेरणीसाठी गव्हाची जात आहे= डब्ल्यू 34 एके डब्ल्यू 4627