About Me

काकडी च्या पिकाचे जास्त उत्पन्न कसे काढायचे.

|KAKDI| काकडी चे पीक कसे घ्यायचे. |kakdi che pik|




 

काकडी हे पीक सर्व भारतात घेतले जाते . काकडी चे पीक कोकणात जास्त पाऊस पडणाऱ्या भागात पण काकडी चे पीक भरघोस उत्पन्न येते. काकडी पासून कोशिंबीर बनविली जात असते या मुळे काकडी चे आहारामध्ये दररोज उपयोग होतो. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 3711 हेक्टर वरती काकडी या पिकाची लागवड केली जाते. 

      काकडीला ईतर भाषतील शब्द 

  english =Cucumber 

हिन्दी =ककडी ,खिरा 

 कानडी =संत्रेकाई 

गुजराती =काकडी ,तारकाकडी,तवसे,वाळूक 

बंगाली =खिरा 

 संस्कृत =मूत्रला ,लोमशी सुधासा ,वालूगी ,शंतनू.  

 हवामान आणि जमीन 

 काकडी हे  उष्णता आणि कोरड्या हवामानात वाढणारे पीक आहे पाण्याचा उत्तम निचर  होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य असते . काकडी पिकाच्या लागवडीसाठी मध्यम किवा रेताड जास्त प्रमाणात उपयोगी आहे. जास्त खोल व निचरा होणाऱ्या जमीनीतही लावणी करता येते. काकडी पिकाच्या उत्पादनात हवामान या घटकांचा फार प्रमाणात प्रभाव पडतो. शक्यतो काकडी पिकास उष्ण हवामान चांगले असते.         

लागवडीचा हंगाम

  काकडीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामत होते खरीप हंगामसाठी काकडीची लागवड जून जुलै महिन्यात वउन्हाळा हंगाममध्ये जानेवारी महिन्यात करतात 

काकडीच्या काही जाती  

       काकडीच्या सर्वात जास्त घेतल्या जाणाऱ्या जाती पैकी खालील काही जाती आहेत , us 800 ,शिवालीक (shivalik),tata 11 ,zipsi(जिप्सी),स्वाती swati या जातीमध्ये हिरवे आणि पिवळट तांबडी फळे येतात.  प्रिया ही जात संकरीत जात आहे. त्यांची फळे रंगाने गर्द हिरवी व सरळ असतात. काही जाती लवकर येणारी जात असून फळे हिरव्या रंगाची असतात.

काकडी लावण्यासाठी पूर्वमशागत आणि लागवड. 

    काकडीच्या लागवडीसाठी जमीन उभी आडवी नांगरून घ्यावी. ढेकळे निघाली असतील ती फोडून घ्यावी. व एकदा परत वखारणी द्यावी. शेतात 30-40 गाड्या शेणखत 1 हेक्टर ळा टाकले पाहिजे. आणि 30/30/30 च्या अंतराने खडे खोडून त्यामध्ये शेणखत टाकून त्यामध्ये 2-3 काकडी च्या बिया लावल्या पाहिजेत. 

      काकडीसाठी खते व पाणी व्यवस्थापन 

काकडीसाठी  50 किलो नत्र 50 किलो पालाश आणि 50 किलो स्फुरद लागवडीपूर्वी द्यायला पाहिजे. आणि लागवडीनंतर 1 महिन्याच्या अंतराने नत्राचा दूसरा हप्ता ध्यावा व पावसाळ्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पानी द्यायला पाहिजे आणि उन्हाळ्यात 4-5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. जर वेळीची वाढ खुंटली असेल तर त्याला liqid पण दिले जाते त्यामध्ये वेळ लवकर वाढावी म्हणून 19-00-19 फळाची गर्भ धारणा होण्यासाठी 12-61-00  हे वापरतात. पांढरी मुळी चालण्यासाठी (भूमिक) हे 1 किलो 200 लिटर पाण्यामध्ये टाकून 350 झाडाना driching द्यावी. त्यामुळे झाले लवकर वाढन्यास मदत होते.

काकडीला गरज पाहून पानी द्यायला पाहिजे. काकडी च्या पिकाला पाण्याचा तुटवडा पडायला नको पाहिजे,जर उन्हाळ्यात उन्हाचे प्रमाण जास्त असेल तर पाण्याचा ताण आला तर वेल पिवळे पडतात. शक्यतो फूलधारनेच्या वेळेस पाणी योग्य प्रमाणात देणे फार महत्वाचे आहे. पाण्याचा ताण देऊन एकदम जास्त प्रमाणात पानी दिले तर फळाला तडे पडून फळे फुटतात. आणि काकडी साठी जेबरिलिक अॅसिड १०-२५ ppm किवा बोरॉन ३ ppm ची फवारणी पीक २-४ पानावर असताना करावी . त्यामुळे मादी फुलांची वाढ होण्यास मदत होत असते. 

     काकडीसाठी कीड व्यवस्थापन 

फळकुज आणि खोडकुज ह्या काकडी पिकावरील मुख्य रोग आहेत. त्यासाठी mancozeb किवा clorothyaalonol  २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायला पाहिजे. तसेच काकडी वर जर का पांढरी माशी किवा तुडतुडे पडले असतील, तर यांसारख्या रसशोषक किडीचा प्रतिबंध करणे फार महत्वाचे असते. त्यासाठी ईमोडाकलोप्रीड किवा उलाला या कीटकनाशकची फवारणी प्रती १५ लिटर पाण्यात ८ ते १० मिलि या प्रमाणात करावी.