About Me

दुधी (भोपळा )ची लागवड करून जास्त उत्पन्न कसे घ्यायचे.

              दुधी (भोपळा )ची लागवड करून जास्त उत्पन्न कसे घ्यायचे.

दुधी भोपळ्यांसाठी जमीन आणि मशागत 

शेतकऱ्यांनी दुधी (भोपळा ) ची लागवड करताना पहिल्यांदा जमीन कशी आहे. आहे ते बघितल पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे आपण कोणत्या हंगामात आपण लागवड करणार आहोत ते महत्वाचे आहे. आपण जर पावसाळी हंगामात लागवड करणार कसलो तर जमिनीतून पाण्याचा निचरा होनारी व लवकर कोरडी होणारी पाहिजे. त्यामुळे पिकाला योग्य त्या प्रमाणात वाढ होते आपण खत देतो ते पन योग्य त्या पिकाला योग्य प्रमाणात लागले पाहिजे. उन्हाळी हंगामात दुधी(भोपळा ) ची लागवड करताना जमीन ही दमदार आणि पाणी धरून ठेवणारी पाहिजे. कारण जर जमीन पानी धरून ठेवणारी असली तर उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असल्यास पानी कमी लागते. 

     दुधी भोपळा लागवड 

   जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळवावे 

लागवड जून -जुलै आणि जानेवारी -फेब्रुवारी महिन्यात करायला पाहिजे. 

मांडव करताना 5/5 फुटावर अंतराने मांडव तयार करायला पाहिजे ,आणि त्याच अंतराने लागवड करावी. 

लागवडीपूर्वी मातीचे परिक्षण करून घ्यावे आणि निरीक्षणानुसार 50 किलो नत्र ,50 किलो पालाष आणि 50 किलो स्फुरद द्यायला पाहिजे  

लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्र द्यावे. प्रतीहेक्टरी 2.5 किलो बियाणे लागते लागवडीसाठी nirmal 48 ही जात निवडावी कारण या जातीच्या भोपळ्याला आवक पान जास्त आहे आणि त्याच्यावर रोग पान कमी पडतो. म्हणजे तो रोगाला बळी पडत नसतो. 

 लागवड 

     प्रथम वाफ्यात रोपे तयार करून त्यांना 2-3 पाने फुटल्यावर त्याला वेगळे करून जेथे लावायचे असतील तेथे खडा खोडून त्यामध्ये खत टाकून तेथे लावावे . लावताना ते जास्त प्रमाणात जमिनीत पण पुरू नये . त्याचे मुळे आणि थोड्या प्रमाणात झाडाचे खोड जमिनीत पुरावे. आणि त्या झाडाला थोड्या प्रमाणात भर द्यावी . कारण ते झाड पानी दिल्यावर खाली पडू नये. आणि नंतर त्याला पानी द्यावे.

दुधी भोपल्याला वाढवण्याची पद्धत 

दुधी भोपळा वाढवतांना त्याला liquid दिले जाते त्यामध्ये 19-19 असते हे टाकल्यामुळे झाड लवकर वाढते. 23-40 हे जे दुधी चे झाडे लहान असतात त्यांना विशेषता टाकतात (भूमिक ) हे पन टाकतात ते पान liquid सारखच असत त्यामुळे दुधी च्या झाडाची पांढरी मुळी पटापट वाढायला सुरवात होते. आणि पांढरी मुळी वाढली की झाडाची वाढ पन जोमत होत असते. भोपल्याला तयार केलेल्या मंडवाच्या साह्याने खुंटाला बांधून वरती चढवतात . चढवत असताना त्याच्या बाजूला जे कोम  निघतात ते पण काढून टाकायचे असते ,ते जर काढले नाहीत तर वरचा जो शेंडा असतो तो जोरात वाढत नाही त्याची वाढ खुंटते . भोपळा जेव्हा मांडावापर्यन्त गेल्यावर त्याला तीन फुट वरती गेल्यावर त्याचा शेंडा कापतात. आणि त्याला जि बाजूने शेंडा फुटतो त्याला भोपाळा लागतो आणि तिथेच नवीन वेल पण निघतो आणि मग भोपळे लागायला सुरवात होत असते.  

दुधी भोपाळ्यावरील कीड नियंत्रण 

   तुडतुडे 

हे किडे सगळीकडे आढळतात देश विदेशात हे असतात ते किडे पिवळ्या ,पांढऱ्या ,भुरकट रंगाचे असतात . ते तिरपे चालतात पान जास्तीत जास्त ते उडया मारतात . ते सर्व प्रकारच्या पिकावर गवतावर झाडावर असतात. ते झाडाच्या पानाच्या खालून बसतात आणि तेथूनच अन्नद्रव्य ग्रहण करतात. त्यामध्यी माधी जि असते ती पानाच्या खालून शिरावर अंडी घालते आणि नवीन तुडतुडे तयार होतात. त्यावर उपाय योजना म्हणजे कीटक नाशक फवारतात त्यामध्ये ACTRAव KRATE हे कीटकनाशक फवारतात . 

नाग आळी 

जेव्हा अळी पानावरील हरितद्रव्य खाते तेव्हा ज्या रेषा पडतात त्याला नाग आळी असे म्हणतात. आणि नंतर त्या पानाला बोगदे पडतात. आणि काही दिवसांनी त्या पानाची गळती होते त्याला पानगळ असे म्हणतात.                       त्याला उपाय योजना म्हणजे त्यावर निंबोळीअर्क 5% व निम तेल 50 ml प्रती 15 लिटर च्या पंपाला फवारावे हे फवारल्यामुळे नाग आळी चा योग्य प्रबंध करता येतो.