कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2024 असा करा अर्ज
पंतप्रधान कुसुम योजना उदेश-
कुसुम सोलर पंप योजना ही श्री अरुण जेटली यांच्यायाद्वारे केंद्र सरकारने देण्यात आली आहे. त्यांच्या या योजनेमागाचे मुख्य उदिष्ट एवढेच आहे की , कमीत कमी मूल्यात सौर पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. या योजनेमद्धे खर्च एकूण तीन विभागांमध्ये विभागला जाणार आहे. ज्या मध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे.
एक लाख सौर पंप उभारण्यात येणार आहेत. एक लाख भरण्यासाठी 1969 कोटी खर्च अनपेक्षित असून 30 % म्हणजे 585 कोटी लाभार्थी यांच्याकडून उपलब्ध होणार आहेत. एक हजार 211 कोटी इतका निधी राज्य शासन देणार आहे. यामुळे पुढील पांच वर्षात प्रत्यक 436 कोटी अर्थसंकल्प आणि तरतूद व 775 कोटी अतिरिक्त वीज विक्री कर मार्फत निधी दिला जाणार आहे.
*सरकार शेतकऱ्यांना 60%अनुदान देईल.
* 30%खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
*शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या खर्चाच्या केवळ 10%रक्कम द्याव्या लागणार आहेत.
कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 अभियानंतर्गत पुढील 5 वर्षात 5 लाख पारेषाण विरहित सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहेत. त्या पैकी पहिल्या वर्षात 1 लाख पंप मंजूर करण्यात येणार आहेत. त्या मध्ये प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास प्राधान्य तत्वावर योजना दिली जाणार आहे.
यात 2.5 एकर क्षत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे 3 HP , 5 एकर क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांची 5 HP व त्यापेक्षा जास्त क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 7.5 HP डीसी पंप स्थापित करण्यात येणार आहेत.
कुसुम योजनेसाठी लागणारे कागदपत्र
*आधार कार्ड
* जातीचा दाखला
*सातबारा (2024 चा असावा ) पाणी स्रोथ. विहीर किंवा बोरवेल नोंद असावी.
*बँक पासबुक
*मोबाईल नंबर
*लाईट बिल
* नदी (असल्यास पाणी परवांकी लागेल)