कारले हे वेलवर्गीय पीक आहे. कमी काळात जास्त उत्पादन व चांगला बाजार भाव मिळाल्यास जास्त नफा मिळून देणारे पीक आहे. कारले हे मधुमेह आणि हृदयविकारांसाठी औषध आहे,असे मानले जाते याच कारणामुळे कारली साठी भारतात आणि विदेशात जास्त मागणी आसते. कारल्यामध्ये जीवनसत्व अ ,आणि क ,प्रोटीन, काऱ्बोहायरेड ,लोह ,फोसपरस ,चुना अधिक प्रमाणात आहेत. कारल्याचा कडूपणा त्यातील मोमोरडिसीन या द्रव्यांमुळे असतो. कारली चा रस हा पितानाशक म्हणून ओळखतात.कारल्याची भाजी पान तयार करून खातात.
कारलीसाठी हवामान:
कारली पिकाची लागवड ही उन्हाळी व पावसाळी या दोन हंगामात जास्त केली जाते. कारलीला उष्ण आणि दमट हवामान जास्त चांगले असते. कारलीच्या वेलीवर थंडीचा जास्त परिणाम होतो. हिवाळ्यात वेलीची वाढ खुंटते,आणि परागकण तयार होतात.
जमीन
भुसभुशीत चांगला निचारा असणारी भारी व मध्यम प्रकारच्या जमिनीत कारलीची लागवड करायला पाहिजे. उन्हाळी लागवड करायची असेल तर उतार असणाऱ्या जमिनीत लागवड करू ने कारण तेथे पाणी योग्य प्रकारात देता येत नाही. सिंचनाद्वारे पाणी द्यायचे असेल तर ठीक आहे. आणि पावसाळ्यात उताराच्याच ठिकाणी लावलं पाहिजे कारण पाण्याचा निचारा चांगला होता. आणि पीक पान चांगले तयार होते.
जमिनीची मशागत आणि लागवड.
जमीनची उभी आणि आडवी नांगरणी करून घ्यावी आणि गवत असेल तर ते वीचुन टाकावे, त्यामुळे शेत मोकळे होते. त्यामध्ये शेणखत टाकले पाहिजे. कारलीची लागवड ही ताटी पद्धतीने करायला पाहजे. लागवड करण्यासाठी 1.5/ 1 मीटर अंतराने लागवड करावी. लागवडीसाठी हिरकणी,चिवा ,पाली ,फुले,एनएस 452(नामधारी) nirmal seeds ग्रीन या जाती निवडाव्या ,लागवडीसाठी हेक्टरी 2 किलो बियाणे लागते. लगावडीच्या अगोदर बियाण्यास 2.5 ग्राम काब्रेन्डझीमची बिजप्रक्रिया करायला पाहिजे. लागवडी अगोदर 100 किलो नत्र ,50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाष प्रतीहेक्टर द्यायला पाहिजे. तसेच फळमाशी ,सूत्रकृमीचा प्रादुर्भाव दिसतो.
खते व पाणी व्यवस्थापन:
बियाणे टाकल्यानंतर चांगले आणि दर्जेदार उत्पादनासाठी योग्य वेळी काळजी घेणे महत्वाचे आहे. जर का योग्य नियोजन केले तर त्याचा योग्य फायदा होईल. त्यात महत्वाचे म्हणजे खत ,पानी व औषध व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे.
कारले पिकासाठी खत नत्र हे 20 किलो प्रती हेक्टर आणि स्फुरद 30 किलो व पालाश 30 किलो प्रती हेक्टर लागवडीच्या वेळी द्यायला पाहिजे.
खताच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये 20 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाष द्यावे.
कारले पिकांच्या लागवडीसाठी शेण खत अगोदर टाकलेले असते. त्यामुळे नंतर शेणखत टाकण्याची गरज पडत नाही. टाकलेल्या शेणखतामुळे जमीन भुसभुशीत राहते व पिकांची चांगली वाढ होते व आपण खालून दिलेल्या पाण्याची जमिनीमध्ये चांगल्याप्रकारे वेल पाणी शोषून घेतात.
वातावरण पाहून किवा जमिनीची वल पाहून खालचे पाणी द्यावे. तसेच फळे लागण्याच्या काळात पाणी अनियमित दिल्यामुळे फळांचा आकार वेडावाकडा होतो व फळे लुज पडतात. व फळांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही फळांचे देठ पिवळे पडून कळी खाली पडते.
रोग नियंत्रण
कारले पिकावर जास्त प्रमाणात येणारा रोग म्हणजे भुरी केवडा मर रोग या रोगाचे प्रमाण जास्त असते. या फळ रोगाचे प्रमाण जास्त आणि वेलीनची वाढ कमी होते, व वेल जळून जातात किवा पांढरी पडतात यामुळे फळांची लागण कमी होते व फळांची वाढ खुंटते व फळांचा रंग विचित्र होऊन पांढरा पिवळसर पडतो.
पांढरी माशी
फळांवर पांढरी माशी आणि मावा ,तुडतुडे अंकुर व मुळे खाणारी आळी देठ कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. म्हणून किडीनची प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला फवारणी करणे गरजेचे असते कीड पाहून किटकनाशक फवारायला पाहिजे. माशी पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. प्रतिबंध करण्यासाठी 2 लिटर गोमुत्र +2 लिटर ताक /15 लिटर पाण्यात मिसळून 8-10 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारावा.
पांढरी माशी दिसून येताच नियंतरानासाठी डायफेनथियोरॉन 50 pw 20 gm किवा स्पीरोमेसिफीन 240 (ओबेरॉन) 18 ml किवा 50%+ईमिडाक्लोप्रीड 1.8 sc 50 ग्राम फ्लोनीक्यामिड 6 ml /15 लिटर पाण्यातून फवारावा .
अंकुर आणि मुळे खाणारी अळी
अळी पिकाचे मातीपासून मुळाचे व खोडाचे नुकसान करते. प्रतिबंध करण्यासाठी काऱ्बो फ्यूरान 3 ग्राम कार्बोमाइन 12 ग्राम प्रती एकर सरीत टाकले पाहिजे. उभ्या पिकातील नियंतरणांसाठी फिप्रोनिल 5%sc रेजेट आणि 500 ml कीवा क्लोरपायरीफॉस 20 ec ते 2 लिटर सिंचनाच्या पाण्यासोबत द्यायला पाहिजे.
नाग आळी
नाग आळी पानांवर सफेद रंगाच्या रेषा ओढते. आणि नियंत्रणासाठी अबामेकटींन 1.9 ec 6 ml /15 लिटर पाण्यातून किवा डाईफेनथीयोरॉन 50 wp /20 ग्राम कीवा स्पीरोमेसिफेन 240 sc /18 मिलि 15 लिटर पाण्यातून फवारणी करायला पाहिजे.