सौर कृषीपंप योजना 2021 पुन्हा सुरू
मुंबई,दि : केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'महाकृषी ऊर्जा अभियान ' अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत सौर कृषीपंपासाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. असे आवाहन महाऊर्जा च्या वतीने करण्यात आलेले आहे.
प्रधानमंत्री कुसुम-ब योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी ,5 एच. पी व 7.5एच .पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपासाठी अर्ज करता येणार आहेत. ही योजना केवळ जेथे वीज पोहचली नाही . किवा पोहचु शकत नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गांतिल शेतकऱ्यांसाठी 90%व अनुसूचितील जाती व जमाती प्रवर्गांतील शेतकऱ्यांसाठी 95%अनुदानावर सौर कृषी पंप देणार आहे
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकरी लभार्थयास प्राधान्य या तत्वावर सौर कृषी पंप योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. (Reference :mahasamvd )
उपलब्ध पंप
3 HP
5 HP
7.5 HP
अनुदान
खुला वर्ग 90 %अनुदान
अनुसूचित जाती व जमाती 95%अनुदान
कागदपत्रे
आधारकार्ड
जातीचा दाखला
सातबारा (2021 चा असावा )
बँक पासबुक
मोबाईल क्रमांक (OTP) साठी लागणार आहे.
पासपोर्ट साईझ फोटो
अट व पात्रता
ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहचलेली नाही त्यांच्यासाठीच ही योजना देण्यात येणार आहे.
प्रथम येणाऱ्या शेतकरी लभार्थयास प्राधान्य तत्वावर सौर कृषी पंप योगानेचा लाभ देण्यात येणार आहे.