कमी कालावधीत दोडक्याचे पीक घ्या आणि चांगला नफा मिळवा.
![]() |
दोडका पिकासाठी लागणारे हवामान आणि हंगाम
हवामान
दोडका या पिकांची लागवड उन्हाळी आणि पावसाळी या दोन हंगामात करतात. दोडक्यासाठी समशीतोष्ण व दमट हवामान लागते. कारण दोडका हा याच हंगामात चांगला येत असतो. दोडका थोडी थंडी पान सहन करू शकतो. पण दोडका थंडीच्या हंगामात लावल्यास त्यावर वायरस येत असतो. त्याचे कारण म्हणजे दोडक्याला जास्त थंडी सहन होत नाही.
हंगाम
दोडक्याची लागवड उन्हाळी पिकासाठी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात करत असतात. फारच उशीर झाला तर मार्च मध्ये करतात. आणि खरीप ची लागवड करायची असली तर जून कीवा जुलै महिन्यात करत असतात. दोडका हा कमी दिवसांत येणार पीक असल्यामुळे त्याची लागवड थोडी उशिरा १०-२५ दिवस झाले तरी करता येते.
दोडक्याचे बियाणे कोणते निवडायचे
को १
को १ ही जात सगळ्यात हळी म्हणजे सर्वात लवकर येणारी जात आहे .त्याला ६० ते ७५ सेमी लांबीचे दोडके लागत असतात. तिच्या पप्रत्येक वेळीस ४ ते ५ किलो दोडके लागत असतात.
पुसा नसदार
या जातीचे फळे एकसारखी लांब आणि हिरवी रंगाची असतात. ही थोडी गरवट म्हणजे थोडी उशिरा येणारी जात आहे. या जातीस कमीत कमी ६० दिवसानी फुले येत असतात. या जातीच्या प्रत्येक वेलीस १५ ते २० फळे लागत असतात.
पूर्वमशागत व लागवड
जमीन उभी आणि आडवी नांगरून घ्यावी. नंतर त्या मध्ये गवत असल्यास गवत विचुन टाकावे. नंतर जमिनीमध्ये शेणखत टाकावे. त्यांतर शेतात रोटरी मारून सर्व शेणखत चांगले निसळून घ्यावे . आणि आपल्याला जेवढ्या अंतरावर दोडका लावायचा असेल तेवढ्या अंतरावर सरी मारून तेथे खडा खोडून घ्यावा. दोडका लगावडीच्या अगोदर शेणखत असेल तर पुनः शेणखत टाकावे ,रासायनिक खत असेल तर ते पान थोड्या प्रमाणात टाकावे. आणि त्या ठिकाणी २ ते ३ बिया त्या खड्यात आणी त्यावर थोडी माती टाकावी. आणि त्यानंतर आशीर्वाद दशावतार च पानी त्यावर टाकायच.
आंतरमशागत
आपण लावलेल्या दोडक्याच्या झाडा च्या बाजूचे गवत काढून टाकले पाहिजे. आणि त्याच्या बाजूची जागाची खुटलं पाहिजे कारण तेथील जागा ही भुसभुशीत राहते आणि झाडाला मुळे घालण्यास मदत होते. या झाडाला आधाराची गरज असते. त्यामुळे याला बांबुचा मांडव तयार करावा लागतो. आणि वेल त्यावर चढवावे लागतात . आणि वरती गेल्यावर फळे लागतात ,आणि चांगले उत्पन्न मिळते.
पाणी व्यवस्थापन
पाणी हे ठिबक सिंचनाने द्यायला पाहिजे त्यामुळे दोडका मोठा व चविष्ट होत असतो. आजूबाजूची पाले कोरडी असल्याने झाडाची वाढ ही झपाट्याने होत असते. आणि पानी देताना झाडचा देठ भिजला नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे.
पानी देण्याच्या पान काही वेळ असतात त्या अशा थंडीमद्धे सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत पानी द्यावे. उन्हाळ्यामद्धे सकाळी ९ च्या आत पाणी द्यायला पाहिजे . फूल लागल्यानंतर ४ थ्या दिवशी पानी द्यायला पाहिजे. जर पाण्याचा ताण बसला तर दोडक्याची वाढ होते पान तो आतून पोकळ राहत असतो,आणि अश्या दोडक्यांना बाजारात किमत कमी असते आणि त्याचे वजन पन कमी असते आणि पैसे पण कमी मिळतात. म्हणून पानी व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे.
कीड आणि रोग व्यवस्थापन
फळमशी
फळमाशी च्या नियंत्रणासाठी १०0 लिटर पाण्यात १०० मिलि मालथीऑन व १०० ग्रॅम गूळ मिसळून त्या द्रवणाची फवारणी वेलीवर फूल धरण्यास सुरवात झाल्यावर करावी. कीव दुकानांमध्ये त्यासाठी लॅम्प भेटतात ते लावावे त्यामुळे फळमाशा त्या लॅम्प मध्ये जातात आणि मरतात.
मावा
मावा या किडीच्या नियंत्रणासाठी १०० लिटर पाण्यात ४०० ग्रॅम काऱ्बोरील मिसळून तयार केलेल्या द्रवणाची वेलीवर बियाणे लावण्यापासून ३ आठवड्याने फवारणी करायची असते.
रोग व्यवस्थापन
भुरी
भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी १०० लिटर पाण्यात ५० ग्रॅम बावीस्टीन ची कीवा १५० ग्रॅम क्यारीथॉन मिसळून त्या द्रवणाची फवारणी केल्याने फळधारने नंतर २ आठवड्याच्या अंतराने फवारणी करत राहावी.
करपा(मर रोग )
करपा हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. कारण हे एक असा रोग आहे की तो फळे लागण्याच्या वेळेसच येतो आणि सर्व झाडे शेनड्यापासून सुकत येतात त्याला करपा म्हणतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी १०० लिटर पाण्यात २५० ग्रॅम डाएथेन एम -४५ किवा ३५० ग्रॅम कॅप्टन किवा २५० ग्रॅम कॉपर ओकसिक्लो राईड १०० लिटर पाण्यात मिसळू या द्रावणाची आठवड्याच्या अंतराने वेलीवर फवारणी करायला पाहिजे ,ज्यामुळे हा रोग थांबेल.