|KANDA| कांदा पीक आणि त्याच्या चांगल्या जाती कोणत्या आणि उपाययोजना | KANDYACHE PIK|
कांदा
कांदा हे पीक कमी कालावधीत येणारे, आणि तुलनात्मकदृष्ट्या कमी भांडवली खर्चाचे परंतु चांगले उत्पन्न मिळवून देणारे व्यापारी पीक आहे. कांदा-उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात जवळजवळ ६० लाख हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेतले जाते. राज्यातील कांद्याचे वार्षिक उत्पादन ६.५ लाख मे. टनाहून अधिक आहे. देशातील एकुण कांदा-क्षेत्रापैकी २० टके क्षेत्र महाराष्ट्रात आहे. आणि एकूण उत्पादनात २२ टके वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे.
कांदा पिकासाठी हवामान.
कांदा हे पीक हिवाळी (रबी) पीक आहे . सुरवातीच्या काळात या पिकास १२,८ ते २३.९ से.ग्रे तापमान लागते व कांदा पोसत असताना १५.६ ते २१.१ से. ग्रे तापमान व ७० आदरता पोषक असते. असे असले तरी महाराष्ट्रात कांदा हे पीक विविध हंगामात घेतले जाते.
कांदा पिकासाठी जमीन
जमीन ही मध्ये ते कसदार जमीन कांद्याच्या पिकासाठी चांगली मानली जाते. भारी ,चिकन ,पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनी कांद्यासाठी वापरू नये.
कांद्याचे रोप तयार करणे
खरीप पिकासाठी गादी वाफ्यावर रोपे तयार करतात. रबी व उन्हाळी हंगामसाठी सपाट वाफ्यात रोपे तयार केली जातात. एक हेक्टर लागवडीसाठी १५ ते २० आर (गुंठे ) क्षेत्रावर तयार केलेली रोपे पुरेशी होतात , हेक्टरी १० किलो बी लागते
रोपे तयार करण्याच्या क्षेत्रावर जमीन भुसभुशीत करून त्यात चार-पाच गाड्या चांगले कुजलेले शेणखत तसेच २.५ किलो नत्र व ५ किलो स्फुरद टाकतात. बियाणे पाच से.मी अंतरावर व दोन से. मी खोलीवर पेरतात. रोपे ६-८ आठवड्यात लागवडीस तयार होततात.
बी-पर्णीपूरवी त्यावर प्रक्रिया म्हणजे तीन ग्राम थायमर हे बुरशीनाशक एक किलो बियाण्यासाह या प्रमाणात चोळतात रोप उगवल्यानंतर मर या रोगाची लक्षणे दिसू लागताच कॅप्टन किवा थायरम या औषधाचे दोन टके द्रावण जमिनीतून देतात. करपा हा रोग आढळल्यास ,२५ ग्राम डाएथेन एम ,४५ '१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करतात.
कांद्याची पुनरलागण
सह ते आठ आठवड्यांची रोपे साधारणता २०-२५ से. मी उंचीची होतात. रोपांची पुनरलागण सपाट वाफ्यात अगर सरी -वरंबा पद्धतीने केलेल्या जमिनीत करतात. वाफयाचे आकारमान २ मिटर रुंद व ३ ते ५ मिटर लांब असणे अपेक्षित आहे
रोपांमधील व दोन वोळीतील अंतर खरीप लागवडीसाठी अनुक्रमे १० से . मी असते . रबी व उन्हाळी कांद्याची लागण १२.५ +७.५ से ,मी अंतरावर करतात.
कांद्यासाठी खते
कांदे पिकासाठी दर हेक्टरी ४०-५० गाड्या शेणखत तसेच एकूण १५० किलो नत्र ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश ही रासायनिक खते आवश्यक आहेत . संपूर्ण शेणखत ,अर्धे नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश ही खते पूर्वमशगतीच्या वेळीच देतात. नत्राची राहिलेली अर्धी मात्रा विभागून लावणीनंतर तीन-चार आठवड्याने दूसरा हप्ता या पद्धतीने दिल पाहिजे पान खते देताना मात्र जमिनीतीत ओल असावी.
आंतर्मशागत आणि पाणीपुरवठा गवत नष्ट करण्यासाठी दोन खुरपण्या आवश्यक आहेत किवा तंणशक (गोल )फवारावे . लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे . रोपाणी मुळे धरल्यावर लगेच पण्याची गरज असते. त्यानंतर वाडीबरोबर पाणी द्यावे. त्यासाठी दर १०-१२ दिवसांनी पाणी द्यायला पाहिजे. रबी व उन्हाळी हंगामात ६-७ दिवसांनी पाणी द्यायला पाहिजे.
कांदा पिकासाठी संरक्षण उपाय
टाक्या मुरडा ,पाने कुरतडणारी आळी ,फुलकिडे
या किडीच्या नियंत्रणासाठी रोप लावल्यानंतर २० दिवसांनी १० मीली म्यालेथिऑन (५० ई . सी )१० लिटर पाण्यात आवश्यकतेनुसार मिसळून दर १५ दिवासानी द्यावे.
करपा ,काळा करपा रोग
या रोगामुळे पातीवर तांबूस लांबट गोल ठिपके किवा पट्टे पडतात आणि पान (पात)शेनड्यांकडून वाळू लागते ,या मुळे कांद्याची वाढ हॉट नाही . या रोगाच्या नियंत्रणासाठी २५ ग्राम डाएथेन एम ४५ (७५ डब्लु पी ) दहा लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसांच्या अंतराने दोन-तीन वेळ फवारावे. कांद्याची पंत गुळगुळीत असल्याने औषधपातीला चिटकत नाही. ते पातीला चिटकणे आवश्यक आहे. म्हणून त्यासाठी १० लिटर द्रावणात ५-६ मी,ली या प्रमाणात स्याडोवीट सारखे चिकट द्रव्य वापरावे लागते.
कांद्याची काढणी
कांद्याची काढणी कांद्याची पात पिवळसर पडत चालली की कांदा पक्व होतो. आणि कांदा वर जमिनीलगत वाकून मोडते . याला 'माना मोडणे ;असे म्हणतात. कांदा काढणीच्या अगोदर १०-१२ दिवस अगोदर पानी देणे बंद केल पाहिजे.
कांदा काढल्यानंरतर कडक ऊन नसेल तर पातीसकट कांदा शेतात ४-५ दिवस राहून द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे मुळया व पात कापतात. कांदा सावलीत वाळवतात